माझा पहिला फुड review मराठीमध्ये

परवाच दुपारच्या जेवणासाठी कार्लोज आर्ट कॅफे या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला असा योग मला रोजच यावासा वाटतो पण शेवटी घरचं जेवण ते घरचंच जेवण.

माझ्यासारख्या हवेनेपण वजन वाढणाऱ्या व्यक्तीसाठी रोज बाहेरचा जेवण नक्कीच चांगलं नाही. पुण्यात प्रभात रोड आणि कर्वे रोड च्या मधल्या लेन मध्ये हे रेस्टिंरांत आहे

आता रेस्टॉरंट विषयी बोलतो. ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण माझ्या पार्टनर रमण बरोबरची पहिलीच वेळ आणी त्यात हे व्हेज रेस्टॉरंट म्हणजे झालंच. मेन्यू कार्ड बघितल्यावर लक्षात येत की काहीतरी वेगळा खायला मिळणार आहे. आम्ही चिकन व्यतीरीक्त काहीच खात नाही म्हणजे अगदीच तस नाही पण बाहेर खायचं म्हणजे नॉन व्हेजच. हे रेस्टॉरंट एका जुन्या बंगल्यात आहे. पण मॉडर्न इंटिरिअर आहे. menu खूपच interesting आहे. आपल्या रोजच्या भाज्या वेगळ्याच fancy अवतारात पाहायला मिळाल्या.

आम्हाला heavey खायचं नव्हत म्हणून आम्ही तीन dish ऑर्डर केल्या आणि आम्हाला तीनही dish खुप आवडल्या.

so baked salad – ह्या मध्ये bake केलेले cauliflower आणी broccoli , चटपटींत चण्यावर घातलेले होते आणि या हटके सलाड वर चटपटीत दह्याचं dressing होतं. वाहं खूप मज्जा अली. सलाड पण इतकं yummy होऊ शकत. worth trying this.

Winsome twosome – ह्या dish मध्ये रताळ्याचे कटलेट होते. आणी ह्या amazing कटलेट्स वर चविष्ट काळे चणे घातले होते अगदी आलू टिक्की छोले सारखं पण जरा healthy.

Noor e tandoor – हा म्हणजे पिझ्झा चा भाऊच. अगदी पातळ whole wheat तंदुरी रोटी च्या बेस वर मशरूम पनीर टोमॅटो ह्याच सुरेख कॉम्बिनेशन खूपच मजा आणत. share पण करावस वाटत नाही पण मी share केलं.

आम्हाला दोघांना इथलं फुड खूप आवडल आणी weekday असल्याने गर्दी पण कमी होती .

मी काही food expert नाही पण मी foodie आहे. आणी त्या नात्याने हे मी लिहीत आहे. just experience share करत आहे. रेस्टॉरंट वाले काही मला पैसे देत नाहीयेत त्यामुळे तुम्हाला माझा पहिला वहिला मराठी इंग्लिश प्रयत्न आवडला तर आवश्य like करा. म्हणजे मला अजुन लिहावसं वाटेल.

मी इथे माझे travel आणी life experience share करणार आहे.

आता इथेच थांबतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s